ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ICC T20 विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सुपर-12 मध्ये पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या संघाचा पुढचा सामना झिम्बाब्वेसोबत आहे आणि यासोबतच भारत उपांत्य फेरीत कोणत्या संघासोबत भिडणार हेही ठरवले जाईल. पण या सामन्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने एक ट्विट केले आहे जे चर्चेत आलं आहे.
झिम्बाब्वेच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला तर ती झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल, असे पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीचे म्हणणे आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले: “पुढील सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने भारताला चमत्कारिकरित्या पराभूत केल्यास मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन.” सहार शिनवारीचे हे ट्विट सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे.
I’ll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match 🙂
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 3, 2022
सहार शिनवारी असे ट्विट करून चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत तिचे ट्विट येतच आहेत. ICC T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे येत्या 6 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी भिडणार आहेत. सध्या सहार शिनवारीच्या ट्विटवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.