PAK vs NZ: भारताच्या जावयाने पाकिस्तानला जिंकवलं

WhatsApp Group

दुबई – आयसीसी टी-20 विश्वचषकात मंगळवारी खेळेल्या गेलेल्या ‘सुपर 12’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला 5 विकेट्सने हरवले. या सामन्यात पाक संघाने गोलंदाजीपाठोपाठ अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवत हा सामना जिंकला. ‘सुपर 12’ फेरीमध्ये पाकचा हा सलग दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी भारताला पराभूत केले आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांमध्ये 8 गडी गमावत 134 धावा केल्या होत्या. 135 धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरेलेल्या पाकिस्तान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानचा संघ ‘सुपर 12’ फेरीच्या ग्रुप 2 मध्ये चार गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पाकचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने धारदार गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये 22 धावा देत न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांना माघारी धाडले.


पाकिस्तानसाठी सलामीविर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 33 धावा केल्या. रिझवान बाद झाल्यानंतर शोएब मलिक आणि आसिफ अलीने डाव सावरत पाकला विजय मिळवून दिला. अनुभवी फलंदाज शोएब मलिकने 20 चेंडूत 26 तर आसिफ अलीने 12 चेंडूत 27 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यासाठी असा होता दोन्ही संघाचा अंतिम 11 संघ

पाकिस्तानचा संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शोएब मलिक, फखर जमान, मोहम्मद हाफीज, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

न्यूझीलंडचा संघ – केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट, टीम साउथी.