पाकिस्तान संघाला मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक

WhatsApp Group

Pakistan New Coach: 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघात दोन मोठे बदल झाले आहेत. संघाने दोन जणांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या आणि लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. पीसीबीने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची कसोटी फॉरमॅटसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गॅरी कर्स्टनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2011 वर्ल्ड चॅम्पियन बनली होती.

गॅरी कर्स्टन यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. याशिवाय ते आयपीएलमधील अनेक संघांचे प्रशिक्षकही राहिले आहेत. आयपीएल 2018 मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक होते, परंतु पुढच्याच वर्षी आरसीबीने त्यांना मुख्य प्रशिक्षक बनवले होते, परंतु नंतर 2 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर ते 2022 मध्ये गुजरात टायटन्समध्ये फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून सामील झाले. आणि गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले. कर्स्टन अजूनही या गुजरात संघाचा एक भाग आहे.

तर जेसन गिलेस्पी यांनी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून 71 कसोटी सामने खेळताना त्यांनी 259 विकेट घेतल्या. त्यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी 97 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात 142 विकेट घेतल्या. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अहर महमूद यांची तात्पुरती पाकिस्तानी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मर्यादित षटकांव्यतिरिक्त महमूद कसोटी फॉर्मेटमध्येही पाकिस्तानी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील, असे वृत्त समोर आले आहे.