Asia Cup 2022: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा केला पराभव, भारत स्पर्धेतून बाहेर

WhatsApp Group

PAK vs AFG: आशिया चषक 2022 मध्ये आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 स्टेजचा जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अफगाणिस्तानच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला केवळ 129 धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाला 130 धावांचे लक्ष्य मिळाले, त्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठले.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तान संघाच्या सलामीवीरांना खिंडार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अफगाणिस्तानला पहिला धक्का हजरतुल्ला झाझाईच्या रूपाने बसला, तर उत्कृष्ट फॉर्मात असलेला रहमानुल्लाह गुरबाजही केवळ 11 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इब्राहिम झद्रानने संघासाठी 35 धावांची भर घातली आणि मोठी धावसंख्या गाठण्याची आशा होती मात्र तो फार काळ टिकू शकला नाही.

करीम जनात आणि नजीबुल्लाह झदरान यांनी अनुक्रमे 15 आणि 10 धावा केल्या. याशिवाय कर्णधार मोहम्मद नबी खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या अजमतुल्ला ओमरझाईने 10 धावा केल्या. शेवटी, राशिद खानने काही आकर्षक शॉट्ससह 18 धावांचे योगदान दिले, ज्यामुळे अफगाणिस्तान संघ केवळ 129 धावा करू शकला.

130 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना खराब फॉर्ममध्ये असलेला बाबर आझम पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करत पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला फखर जमानही नजीबुल्लाहच्या रॉकेट थ्रोमुळे धावबाद झाला. बॅक टू बॅक विकेट्स पडल्यानंतर, डाव सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या खांद्यावर आली. दोन्ही खेळाडूंनी संयमी फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. मात्र 45 च्या स्कोअरवर रशीद खानने मोहम्मद रिझवानला बाद केले.

मोहम्मद रिझवानच्या विकेटमुळे पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या. कारण आतापर्यंत रिझवानने पाकिस्तान संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण बाबर आझमने आणखी एक फासे फेकून शादाब खानला फलंदाजीसाठी पाठवले, त्याने अहमदसोबत 42 धावांची शानदार भागीदारी केली. ज्याने पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. पण अफगाण संघाने हार मानली नाही, रशीद खान आणि फझलहक फारुकी यांनी बॅक टू बॅक विकेट घेत सामना रंजक वळणावर आणला. अखेरच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 12 धावांची गरज होती. आणि हातात फक्त एक विकेट त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानकडून फजल हक आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या.