टी20 विश्वचषकात पाकिस्तानने साजरा केला सलग तिसरा विजय!
पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा प्रवेश जवळपास निश्चित!
दुबई – आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तान संघाने सलग तिसरा विजय मिळवला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकने अफगाणिस्तानचा 5 गडी राखून रोमहर्षक पराभव केला. या विजयासह पाकिस्तान संघाने विजयाची हॅट्ट्रीकही साजरी केली आहे. यापूर्वी पाकने बलाढ्य भारत आणि न्यूझीलंड संघाला पाराभवाचे पाणी पाजले आहे.
दुबई येथे खेळल्या गेलेल्या ‘सुपर-12’ फेरीतील गट-2 च्या या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. यासह पाक संघाने पॉइंट टेबलमधील आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले असून टी-20 विश्वचषक 2021 ची उपांत्य फेरीचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. अफगाणिस्तानसाठी कर्णधार मोहम्मद नबी नाबाद 35 आणि गुलबदिन नायबने नाबाद 35 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 147 धावा केल्या. पाकिस्तानसाठी ईमाद वसिमनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या
148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 51 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये अडचणीत आलेल्या पाकसाठी आसिफ अलीने 19 व्या षटकात 4 षटकार खेचत संघाला शानदार विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक 2 विकेट्स पटकावलेत.
Babar Azam with another classy half-century ????#T20WorldCup | #PAKvAFG | https://t.co/1VM4iAyNq4 pic.twitter.com/vmxaTQcOrx
— T20 World Cup (@T20WorldCup) October 29, 2021
आसिफ अली ठरला पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार
संघ अडचणीत असताना आसिफ अलीने 19 व्या षटकात 4 खणखणीत षटकार खेचत पाकिस्तानला विजयश्री मिळवून दिली. आसिफने आपल्या या वादळी खेळीत अवघे 7 चेंडू खेळताना 4 षटकारांच्या मदतीने 25 धावांची नाबाद खेळी केली. त्याने केलेल्या या खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. आसिफच्या या धमाकेदार फलंदाजीनंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
The player of the match @AasifAli2018 #WeHaveWeWill #T20WorldCup pic.twitter.com/tMWjmnDgkF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 29, 2021
पाहा सामन्याचा संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान – 147/6 (मोहम्मद नबी 35, गुलबदिन नायब 35 : इमाद वसीम 2-25)
पाकिस्तान – 148/5 (बाबर आझम 51, फखर जमान 30 : राशिद खान 2-26)