
क्रिकेटमध्ये रन मशीन म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी विराट कोहली सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेटपंडित त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत, तर काही दिग्गज खेळाडू त्याच्या समर्थनार्थ उभे आहेत. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान कोहली टी-20 मालिकेत अपयशी ठरला, परंतु कंबरेच्या दुखापतीनंतर जेव्हा तो त्याच्या आवडत्या एकदिवसीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये परतला मात्र यातही तो अपयशी ठरला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली अवघ्या 16 धावा काढून बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने त्याच्या समर्थनार्थ एक ट्विट केले जे सध्या व्हायरल होतं आहे.
बाबर आझमने रात्री 12:29 वाजता एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘ही वेळ निघून जाईल, हिम्मत ठेव’. असं ट्वीटमध्ये त्याने लिहिलं आहे.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
बाबरची पाकिस्तानमध्ये अनेकदा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीशी तुलना केली जाते. बाबर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो टी-20 आणि एकदिवसीय ICC क्रमवारीत अव्वल तर कसोटीत चौथ्या क्रमांकावर आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, यजमानांनी टीम इंडियाचा 100 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला होता. लॉर्ड्स वनडेतही रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला झटपट पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत चांगली सुरुवात करून दिली, पण लिव्हिंगस्टोन, मोईन अली आणि डेव्हिड विली यांच्या छोट्या खेळींनी भारताला भारी पडलं आणि इंग्लंडला 246 धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित-पंत यांना खातेही उघडता आले नाही, तर धवनने 9 आणि कोहली 16 धावा करून बाद झाले. भारताचा अर्धा संघ 73 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर भारताला पुनरागमन करणे कठीण झाले आणि संपूर्ण संघ 146 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून टोपलीने 6 बळी घेतले.