पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा 100व्या सामन्यात मोठा पराक्रम

WhatsApp Group

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम केला आहे. बाबर आझमची हा 100वा वनडे सामना होता. या सामन्यात 66 चेंडूत 53 धावा करत बाबरने आपली खेळी खास बनवली. या खेळीसह त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटचीही बरोबरी केली आहे.

बाबर आझमच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 100 डावात 5142 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 18 शतके आणि 27 अर्धशतके आहेत. 100 एकदिवसीय डावांनंतर बाबर आझमकडे सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतके आहेत. या सामन्यात अर्धशतक झळकावताच त्याने जो रूटची बरोबरी केली. जो रूटने 100 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 अर्धशतके केली आहेत.

बाबर आझम सध्या 880 रेटिंग गुणांसह ICC ODI क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर आझम दिवसेंदिवस एकदिवसीय क्रिकेटमध्ये खास फलंदाज बनत आहे. विश्वचषक आणि आशिया चषकापूर्वी बाबरचा फॉर्म पाकिस्तानसाठी चांगला संकेत आहे.