Pakistan Attacks India: जम्मू विमानतळावर पाकिस्तानने 8 क्षेपणास्त्रे डागली, भारताने हवेतच ती उधळली, पाहा VIDEO

WhatsApp Group

गुरुवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमधील विमानतळाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. पाकिस्तानकडून ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच पाडले आहेत.

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही क्षेपणास्त्रे जमिनीवर पडूही शकत नव्हती. त्याआधीच त्यांचा नाश झाला. यावेळी शहरात युद्धाचे सायरन वाजविण्यात आले. हाय अलर्ट दरम्यान ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्थानिक लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रावळपिंडीवरून क्षेपणास्त्रे डागली गेली!
पाकिस्तानने रावळपिंडी येथून क्षेपणास्त्रे डागल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा हल्ला करण्याचा कट उधळून लावला आहे. शत्रू देश पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.

त्याचवेळी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. भारतीय जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत.