PAK vs ZIM: भारतापाठोपाठ झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा केला पराभव, रोमांचक सामन्यात अवघ्या एका धावेनं मिळवला विजय

WhatsApp Group

विश्वचषकातील महत्त्वपूर्ण सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला आहे. पाकिस्तानला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती, परंतु ब्रॅड इव्हान्सने शानदार गोलंदाजी करत अखेरच्या षटकात 9 धावा देऊन 1 बळी घेतला, तर शाहीन आफ्रिदी धावबाद झाला, त्यामुळे पाकिस्तानला केवळ 129 धावा करता आल्या. इव्हान्सने 4 षटकात 25 धावा देत 4 बळी घेतले. या पराभवामुळे विश्वचषकातील पाकिस्तानचा मार्ग खडतर झाला आहे. सलग दोन पराभवांनंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.

पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाची सुरुवात फारशी खास नव्हती. सलामीवीर मोहम्मद रिझवान अवघ्या 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कर्णधार बाबर आझम 4 धावा करून बाद झाला. अवघ्या 36 धावांवर पाकिस्तानच्या 3 विकेट पडल्या. इफ्किखार अहमद 5 धावांवर बाद झाला. मात्र, यानंतर शान मसूदसह शादाब खानने संघाची धावसंख्या पुढे नेली. पण शादाब खान 17 धावांवर बाद झाला. पाकिस्तानच्या संघाने 13.4 षटकांत 88 धावांत 4 विकेट गमावल्या. शादाब खान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला हैदर अलीही पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पाकिस्तानची धावसंख्या 14 षटकात 5 विकेट्स 88 धावांवर झाली. यानंतर 44 धावांवर शान मसूद बाद झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत केवळ 130 धावाच करू शकला. झिम्बाब्वेच्या संघाची सुरुवात चांगली झाली असली तरी संघाने लवकर विकेट न गमावता 5 षटकांत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या. पण पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 19 धावा करून क्रेग इर्विन बाद झाला. पुढच्याच षटकात माधविरेही 17 धावा काढून बाद झाला. चांगली सुरुवात करूनही झिम्बाब्वेचा संघ चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. दुसरीकडे शादाब खानने 4 षटकात 23 धावा देत 3 बळी घेतले. पाकिस्तानची स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने 4 षटकात 29 धावा दिल्या. हरीश रौफने 4 षटकात 12 धावा देत 1 बळी घेतला.