PAK vs SA: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा केला पराभव

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका विकेटने रोमांचक विजय नोंदवला आहे. 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 260 धावांपर्यंत पोहोचेपर्यंत एकवेळ 9 विकेट गमावून बसला होता, मात्र केशव महाराज आणि तबरेझ शम्सी या जोडीने सावध खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. आफ्रिकेसाठी या सामन्यात सर्वाधिक 91 धावांची खेळी एडन मार्करामच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा हा पाचवा विजय असून आता ते 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजीत शाहीन आफ्रिदीने तीन तर हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

या सामन्यातील पाकिस्तानी संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर ते 46.4 षटकात 270 धावांपर्यंत मर्यादित होते, ज्यामध्ये कर्णधार बाबर आझमने 50 धावा केल्या तर सौद शकीलने 52 धावा केल्या. आफ्रिकेकडून गोलंदाजीत तबरेझ शम्सीने 4 तर मार्को जॅन्सनने 3 बळी घेतले. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

टीम इंडियाचे नुकसान

पाकिस्तानचा पराभव आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे टीम इंडियाचे नुकसान झाले आहे. भारतीय संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण आफ्रिकेचा नेट रन रेट खूप चांगला आहे. याच कारणामुळे आज भारतीय चाहतेही पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करत होते, मात्र तसे झाले नाही.

दक्षिण आफ्रिकेचा संघ: क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.

पाकिस्तानचा संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.