Video: पाकिस्तानला हरवल्यानंतर मेलबर्न स्टेडियमवर 90 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गायले ‘चक दे इंडिया’, पाहा खास क्षण

मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली. माजी भारतीय कर्णधाराने कठीण परिस्थितीत 53 चेंडूत नाबाद 82 धावा करून टीम इंडियाला जवळपास हरवलेला सामना जिंकून दिला. त्याचवेळी या विजयानंतर सर्व खेळाडू भावूक झाले होते.
टीम इंडियाच्या विजयानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे दर्शन खूप खास होते. टीम इंडियाच्या या विजयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित सर्व भारतीय प्रेक्षकांनी चक दे इंडिया हे गाणे गायले होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये एकत्र चक दे इंडिया गाण्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येत होता. स्टेडियमचे हे दृश्य खूपच आकर्षक होते. हेही वाचा – T20 World Cup 2022: रोहित शर्मा, विराट कोहली झाले भावूक, हार्दिक पांड्याला अश्रू अनावर
90 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी ‘चक दे इंडिया’ गाणे गायले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना मानला जातो. 2022 च्या T20 विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरही त्याचे विशेष दृश्य पाहायला मिळाले. खरं तर, रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित सुमारे 1 लाख प्रेक्षकांनी चक दे इंडिया हे गाणं गायलं. स्टेडियमचा हा खास नजारा पाहण्यासारखा होता. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सामना पाहण्यासाठी जवळपास 1 लाख प्रेक्षक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले होते. हेही वाचा – IND Vs PAK: विराट कोहलीच्या शानदार खेळीवर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट, म्हणाली…
Video of the day: 90,000+ crowd singing “Chak De India” after the win against Pakistan at MCG. pic.twitter.com/zz8TxVA7MJ
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2022
भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या विशेष विजयानंतर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला की, एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. या पोस्टसोबत कोहलीने या सामन्याचे काही खास फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कोहलीचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.
Special win. Thank you to all our fans for turning up in numbers. 🇮🇳💙 pic.twitter.com/hAcbuYGa1H
— Virat Kohli (@imVkohli) October 23, 2022