
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रिअॅलिटी टीव्ही स्टार बेलिंडा ‘लव्ह’ रायगियर हिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने आतापर्यंत 700 हून अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचा दावा केला असून, यासाठी तिला कोणतीही लाज वाटत नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले आहे.
38 वर्षीय बेलिंडा रायगियर ही 2017 साली प्रचंड गाजलेल्या ऑस्ट्रेलियन रिअॅलिटी शो The Bachelor मधील सहभागामुळे चर्चेत आली होती. तिच्या बोलण्यावरून, एक काळ असा होता की ती आठवड्यातून सहा दिवस वेगवेगळ्या जोडीदारांसोबत रोमान्ससाठी भेटत होती.
अलीकडेच You’re a Grub Mate! या रेडिओ शोमध्ये सहभागी झालेल्या बेलिंडाने आपल्या संभोग अॅडिक्शनबाबत मोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, “माझं संभोग अॅडिक्शन आता पूर्णपणे संपलं आहे. मात्र त्याकाळात मला खूप अस्वस्थता जाणवत होती. प्रेम, स्नेह, आणि जवळीक यांची भूक होती. मात्र आता मी त्या काळातून सावरले आहे.”
तिच्या मते, मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य नसताना संभोग अॅडिक्शन वाढू शकते. “माझ्या वागणुकीमुळे अनेक वेळा मी स्वतःला कमीपणाची जाणीव करून दिली होती. पण आता मी स्वतःला समजून घेतलं आहे. आणि मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही,” असेही ती म्हणाली.
बेलिंडाचा हा उघडपणा आणि स्वीकार अनेकांसाठी धक्कादायक ठरत असला, तरी मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि स्त्रियांच्या लैंगिकतेबाबत खुलेपणाने बोलण्याचा तिचा प्रयत्न समाजात चर्चेचा विषय बनला आहे.