जर्मन इलेक्ट्रॉनिक संगीत प्रवर्तक Oskar Sala यांच्या112 व्या जयंती निमित्त खास गूगल डूडल

WhatsApp Group

Oskar Sala Google Doodle Today: आज जर्मन संगीतकार आणि भौतिकशास्त्रज्ञ ऑस्कर साला (Oskar Sala) यांची 112 वी जयंती आहे. या निमित्ताने गुगल डूडलद्वारे ऑस्कर साला यांची आठवण करत आहे. 18 जुलै 1910 रोजी जर्मनीतील ग्रीझ येथे जन्मलेल्या सालाने इलेक्ट्रॉनिक संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांनी टीव्ही, रेडिओ आणि चित्रपटांसाठी वाद्ये बनवली. ज्याला ट्राउटोनियम म्युझिक म्हणतात.ट्रॅटोनियमची वास्तुकला इतकी वेगळी होती की तो एकाच वाद्यातून अनेक प्रकारचे संगीत वाजवू शकत होता. अल्फ्रेड हिचकॉकच्या द बर्ड्स अँड द रोझमेरी मूव्हीसाठी ते 1959 च्या संगीतासाठी प्रसिद्ध होते. पक्ष्यांचा किलबिलाट, हातोडा, दारे-खिडक्या बंद होण्याचा किंवा उघडण्याचा आवाज ते वाद्य वाजवून काढत असे.

Oskar Sala यांचा जन्म 19710 मध्ये जर्मनीमधील ग्रीज येथे झाला. साला यांच्या आई एक उत्तम गायिका होत्या. त्यांचे वडीलही संगीत क्षेत्रातील एक प्रतिभावान व्यक्तीमत्व होते. त्यासोबतच ते डोळ्यांचे डॉक्टरही होते. वयाच्या 14 व्या वर्षीच ऑस्कर साला यांनी वॉलियन आणि पियानो यांसारख्या संगीत वाद्यांशी दोस्ती केली. पुढे त्यांनी अनेक गाणी आणि सांगितीक रचनाही केल्या.

ऑस्कर साला यांनी जेव्हा पहिल्यांदा ट्रॅटोनियम नावाच्या उपकरण ऐकले आणि पाहिले तेव्हा ते त्याचे तंत्रज्ञान पाहून भाराऊन गेले. त्यानंतर त्यांनी ट्रॅटोनियममध्ये कौशल्य मिळवले. हेच उपकरण त्यांनी पुढे अधिक विकसीत केले. त्यांनी या उपकरणात केलेला विकास हा संगीत क्षेत्राला एक नवी उर्जा देऊन गेला.

ऑस्कर सालाने रेकॉर्डिंग स्टुडिओत बसून अनेक उत्तम संगीत आणि ध्वनी प्रभाव निर्माण केले. टीव्ही, रेडिओ आणि चित्रपटांसाठी तयार केलेले त्यांचे संगीत खूप लोकप्रिय झाले. ऑस्कर सालाला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई अॅनेमेरी एक प्रसिद्ध गायिका होती. त्याचे वडील पॉल हे पॅथॉलॉजिस्ट होते. सालाच्या पालकांनी त्याच्या संगीत प्रतिभेला प्रोत्साहन दिले आणि त्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्याला पाठिंबा दिला. गुगलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सालाने वयाच्या 14 व्या वर्षीच वाद्ये, व्हायोलिन आणि पियानोवर संगीत बनवण्यास सुरुवात केली.