Monsoon Update: मुंबईसह कोकणाला जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

WhatsApp Group

Monsoon Update : नैऋत्य मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अद्याप सक्रिय झालेला दिसत नाही. भारतीय हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर, मुंबई (Mumbai), पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात बंगालचा उपसागर, ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये (Sikkim) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर, १९ ते २१ जूनदरम्यान बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.