
Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतं असतात. या फोटोच्या माध्यमातून अनेकांचा कस लागतो. फोटो संबंधित वस्तू किंवा प्राणी कुठे लपून आहे, हे शोधण्यासाठी चढाओढ लागते. अनेकदा अशी वस्तू शोधण्यात काहीवेळा यश मिळते. पण अनेकदा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला खूप कासवं दिसतील. या फोटोत एक साप लपला आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे. साप शोधण्याआधी एक गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि ती म्हणजे हा फोटो पाहून तुम्हाला फक्त 30 सेकंदात साप शोधायचा आहे.
जर तुम्ही फोटो नीट बघितलात तर तुम्हालाही हे कोडे सोडवण्यात यश येईल. फक्त तुमचे सर्व लक्ष फोटोकडे व्यवस्थित ठेवा आणि पाहात रहा. जर तुम्हाला साप सापडला, तर तुमचं अभिनंदन. तुमचा समावेशही बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या यादीत समावेश झाला आहात. पण जर तुम्हाला साप दिसला नसेल तर खाली दिलेला फोटो पाहा.
हा फोटो बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कासवाची मान थोडी वेगळी दिसत आहे. इतकंच नाही तर तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तिची जीभही बाहेर आली आहे, म्हणजे तो कासव नसून साप आहे.