चार्जिंगची चिंता मिटली! Oppo चा 7000 mAh बॅटरी असलेला दमदार 5जी स्मार्टफोन लाँच; एकदा चार्ज केल्यावर 40 दिवस टेन्शन नाही

WhatsApp Group

स्मार्टफोन विश्वात ओप्पो (Oppo) कंपनीने आपल्या बॅटरी बॅकअपच्या जोरावर पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन Oppo A6 Pro 5G हा स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची ७००० mAh ची महाकाय बॅटरी. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एकदा चार्ज केल्यावर ४० दिवसांचा स्टँडबाय बॅकअप देतो. लांब बॅटरी लाईफ शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

किंमत आणि ऑफर्स

Oppo A6 Pro 5G हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

  • ८जीबी + १२८जीबी: २१,९९९ रुपये.

  • ८जीबी + २५६जीबी: २३,९९९ रुपये. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, एचडीएफसी (HDFC), ॲक्सिस (Axis) आणि एयू स्मॉल फायनान्स बँक कार्ड्सवर ग्राहकांना २,००० रुपयांची तात्काळ सूट मिळत आहे. हा फोन अरोरा गोल्ड आणि कॅपुचिनो ब्राऊन या दोन आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

या फोनमध्ये ६.७५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२० हर्ट्झ (120Hz) रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामुळे फोन वापरण्याचा अनुभव अत्यंत स्मूथ मिळतो. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० (MediaTek Dimensity 6300) प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित कलर ओएस १५ वर चालतो.

कॅमेरा आणि डस्ट-वॉटर रेझिस्टन्स

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. विशेष म्हणजे, या फोनला IP69 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच हा फोन धूळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. सुरक्षेसाठी यात साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

सुपरफास्ट चार्जिंगचा वेग

७००० mAh ची मोठी बॅटरी असूनही ती चार्ज करण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागणार नाही. ओप्पोचा दावा आहे की, ८० वॉट (80W) सुपरवूक फास्ट चार्जिंगच्या मदतीने हा फोन केवळ ६४ मिनिटांत शून्य ते १०० टक्के चार्ज होऊ शकतो. एवढी मोठी बॅटरी असूनही फोनचे वजन २१६ ग्रॅम ठेवण्यात आले आहे, जे हाताळण्यासाठी सोयीस्कर आहे.