“क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज (पुरुष)- आंतर जिल्हा युवा लीग २०२४” स्पर्धेचा आज उद्घाटन समारंभ

WhatsApp Group

पुणे, ०४ मार्च २०२४: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित “क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज (पुरुष) – आंतर जिल्हा युवा लीग २०२४” या स्पर्धेचा आज ‘श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे उद्घाटन होणार आहे. आज स्पर्धेचा उद्घाटन व महिलांचा प्रेक्षणीय सामना होईल. उद्या ५ मार्च २०२४ ते ६ एप्रिल २०२४ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

युवा कबड्डी सिरीज चा “क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज २०२४” हा नववा हंगाम असून महाराष्ट्रातील हा दुसरा हंगाम आहे. आज या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री आदरणीय श्री संजय बनसोडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर असणार आहेत. उद्घाटन समारंभाप्रसंगी डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघ विरुद्ध प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन या महिला संघाच्या मध्ये संध्याकाळी ५ वाजता प्रेक्षणीय सामना रंगणार आहे.

महाराष्ट्रातील नामांकित १६ जिल्ह्याचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून हे संघ पहिल्या फेरीसाठी दोन गटात विभागले असून अ गटातील साखळी पद्धतीने होणारे २८ सामने उद्यापासून ५ मार्च ते ११ मार्च २०२४ दरम्यान होणार आहेत. पहिला सामना मागील क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित युवा कबड्डी सिरीजचा गतविजेता जिल्हा अहमदनगर जिल्हा विरुद्ध मुंबई शहर यांच्यात लढत होणार आहे. प्रत्येक दिवशी एकूण ४ सामने खेळवले जातील. ब गटातील सामन्यांची सुरुवात १२ मार्च २०२४ पासून होईल. दोन्ही गटातील टॉप ४-४ संघ प्रोमोशन राऊंड तर दोन्ही गटातील बॉटमचे ४-४ संघ रेलीगेशन राऊंडचे सामने खेळतील. टॉप १० संघामध्ये प्ले-ऑफसचे सामने व अंतिम सामना होईल. युवा कबड्डी सिरीज ही स्पर्धा प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफ्रॉम फॅनकोड वर दाखवली जाणार आहे.