
मुंबई – शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल ईडीकडून ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. ‘मी ईडीला घाबरुन गुवाहाटीला गेलो नाही. मा घाबरणाऱ्यातील नाही, असा टोला भाजपला संजय राऊत यांनी लगावला.
भाजपने एकनाथ शिंदेंना मुंबईवर भाजपचा झेंडा लावण्यासाठी मुख्यमंत्री केलं आहे, पण मुंबईवर फक्त शिवसेनेचाच झेंडा राहणार आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार आहे, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
राज्यसभेवर माझा पराभव झाला असता तरीही मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलो असतो, मी फुटणाऱ्यातील बुडबुडा नाही. जिथे उद्धव ठाकरे आहेत तिथे शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर बोलताना म्हणाले, मला उप म्हणायला जड जात आहे, पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेश पाळला जातो याचे कौतुक करायला पाहिजे, असंही राऊत पुढे म्हणाले.