नवरात्री गरबा, दांडियासाठी आधार कार्ड तपासून फक्त हिंदू लोकांना प्रवेश द्यावा – नितेश राणे

WhatsApp Group

भाजप आमदार नीतेश राणे यांच्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा. त्यासाठी आयोजकांनी यात सहभागी होणाऱ्या मंडळींची आधारकार्डे तपासावीत, त्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आम्ही आयोजकांना विनंती केली आहे की प्रवेशद्वारावर येणाऱ्या सर्व लोकांचे आधार कार्ड तपासावे आणि फक्त हिंदूंनाच परवानगी द्यावी, हिंदू महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. असं नितेश राणे म्हणाले.