कॅसिनो आणि ऑनलाइन गेमिंग करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून कॅसिनो ऑपरेटर आणि ऑनलाइन गेमिंग खेळाडूंना 28 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यासाठी सर्व राज्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभेत विधेयक मंजूर करण्यास सांगितले आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून 28 टक्के जीएसटी देय होईल. सीबीआयसीचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनो ऑपरेटर्सना मोठा फटका बसणार आहे. कारण त्यांना पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागेल…
GST कौन्सिलचा काय निर्णय आहे?
CBIC चे अध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे तयार आहोत. जीएसटी कौन्सिलच्या मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, संबंधित अधिसूचना प्रक्रियेत आहेत. ते असेही म्हणाले की, “1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू करण्यासाठी, सर्व राज्यांना त्यांच्या विधानसभांमध्ये तो पास करावा लागेल किंवा 30 सप्टेंबरपर्यंत अध्यादेश जारी करावा लागेल.” राज्य सरकारांच्या संमतीनंतरच ही घोषणा करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही.
जीएसटी 10 टक्क्यांनी वाढला
आत्तापर्यंत ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोमध्ये खरेदी केलेल्या चिप्सच्या दर्शनी मूल्यावर आणि घोड्यांच्या शर्यतीच्या बाबतीत बुकी/टोटालायझर्ससह लावलेल्या बेट्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. जीएसटी 28 टक्के करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की आता अनेक ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना सध्याच्या 18 टक्क्यांऐवजी 28 टक्के जीएसटी भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.