OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या OnePlus स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर आणि 67-वॉट SuperVOOC फास्ट चार्ज सपोर्ट सारखे फीचर्स मिळतील. आम्ही तुम्हाला भारतातील OnePlus Nord CE 3 Lite 5G च्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती देऊ.
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची भारतात किंमत
या नवीनतम OnePlus स्मार्टफोनचे दोन रंग प्रकार, Pastel Lime आणि Chromatic Grey लॉन्च करण्यात आले आहेत. फोनची किंमत 19 हजार 999 रुपयांपासून सुरू होते, ही किंमत 8 जीबी रॅम / 128 जीबी व्हेरिएंटची आहे.
8 जीबी रॅम सह 256 जीबी वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. 11 एप्रिलपासून ग्राहकांसाठी कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि Amazon वर या डिव्हाइसची विक्री सुरू होईल.
Now you know!
The #LargerThanLife #OnePlusNordCE3 is here, starting at ₹19,999. pic.twitter.com/h2deZx7sMY— OnePlus India (@OnePlus_IN) April 4, 2023
OnePlus Nord CE 3 Lite 5G तपशील
फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा डिस्प्ले आहे. फोन 240 Hz टच सॅम्पलिंग दर आणि 680 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, वनप्लस ब्रँडच्या या नवीनतम फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या OnePlus फोनमध्ये Adreno 619 GPU देण्यात आला आहे.
फोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे, जी 8 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टच्या मदतीने 16 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनच्या मागील पॅनलवर 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो 3x लॉसलेस झूमला सपोर्ट करतो. यासोबतच 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या समोर तुम्हाला 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरेल.
OnePlus ब्रँडच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा नवीनतम फोन 30 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होतो.