
देशभरातुन दरवर्षी वेगवेगळ्या राज्यातून लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करतात असतात. यात मोजकेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. आता याच यूपीएससी पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बिहार सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. यात त्यांनी बिहार सरकारच्या वतीने 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
बिहार समाज कल्याण विभागाच्या महिला व बाल विकास महामंडळाच्या वतीने एक योजना जाहीर केली आहे. यात राज्यातील सर्वसाधारण आणि मागासवर्गीय महिला उमेदवारांना ही प्रोत्साहन रक्कम एकरकमी देण्यात येईल.
या संदर्भात नोटीस जारी करून पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. wdc.bih.nic.in/Careers.aspx या अधिकृत पोर्टलला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम सर्वसाधारण आणि मागासवर्गीय प्रवर्गातील महिला उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी देण्यात येईल. ही रक्कम उमेदवारांना एकरकमी दिली जाईल, जेणेकरून त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये.
कोण अर्ज करू शकतो
- उमेदवार बिहार राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- उमेदवार हा बिहारच्या SC, ST आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
- उमेदवाराने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 2022 उत्तीर्ण केलेली असावी.
- या योजनेचा लाभ उमेदवारांना एकदाच देण्यात येईल.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय, सार्वजनिक उपक्रम, राज्य शासनाच्या अनुदानित संस्थेच्या सेवेत नोकरी केली आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.