सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी किरकोळ वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या हिंसाचारात वाहनांचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
शहरात 144 कलम लागू
याबाबत माहिती देताना अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा म्हणाल्या की, दोन गटातील किरकोळ वादातून हिंसाचार सुरू झाल्यानंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. हिंसक जमावाने काही वाहनांचेही नुकसान केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दुसरीकडे, सूत्रांचे म्हणणे आहे की, किरकोळ वादातून ही हाणामारी झाली, ज्याने नंतर हिंसाचाराचे रूप धारण केले. हाणामारीनंतर जुने शहरातील पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला.
इंस्टाग्राम पर विवादित पोस्ट के बाद अकोला में हिंसा, एक की मौत । महाराष्ट्र के अकोला में दो समुदायों के बीच हिंसक झड़प हो गई, इस दौरान उपद्रवियों ने तोड़फोड़ के साथ ही आगजनी की अकोला में धारा 144 लागू ।#अकोला #AkolaViolance #Maharashtra pic.twitter.com/xVkBIYCPmd
— Namrata Dubey (@namrata_INDIATV) May 14, 2023
एकाचा मृत्यू, 25 जणांना अटक
या घटनेत आतापर्यंत 25 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पोलिसांनी 120 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशानंतर संपूर्ण अकोल शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अकोल्यातील अलीकडच्या काळात ही दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरातही हाणामारी झाल्याची बातमी समोर आली होती.