ईदच्या एक दिवस आधी मनसेचा मोठा निर्णय, भव्य महाआरती रद्द

WhatsApp Group

मुंबई: मनसेकडून उद्या होणाऱ्या महाआरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या ईद असल्यामुळे आरती न करण्याच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

राज यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणामध्ये कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण नेमकं पुढे काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.