हरियाणा येथे एका 6 वर्षांच्या मुलीच्या पोटात तब्बल दीड किलो केसांचा गोळा सापडला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दीड किलो वजनाचा केसांचा गोळा तिच्या पोटातून काढला आहे one and a half kg hair removed from the stomach . मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी दरम्यान पोटात केसांचा गोळा असल्याची बाब समोर आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला.
हेही वाचा – ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल
हरियाणा पंचकुला येथील या 6 वर्ष मुलीला लहानपणापासून केस खायची सवय होती. मात्र याबाबत तिच्या पालकांना काहीचं माहिती नव्हती. पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा ही बाब समोर आली. शस्त्रक्रिया करून केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे तर मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिला लवकरच घरी सोडण्यात येईल असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा – 24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम