आपल्या पदार्पणाची आठवण करून विराटने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला ’14 वर्षांपूर्वी हे सर्व सुरू झाले आणि…’

14 वर्षांपूर्वी 18 ऑगस्ट 2008 ला म्हणजेच आजच्याच दिवशी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते Virat Kohli international debut. आपल्या 14 वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देत कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कोहलीने काही जुने फोटो वापरले आहेत जे चाहत्यांना जुन्या क्षणांची आठवण करून देत आहेत. या पोस्टसह त्यांनी लिहिले ’14 वर्षांपूर्वी, हे सर्व सुरू झाले आणि हा एक सन्मान आहे’.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर एक नजर टाकल्यास, 18 ऑगस्ट 2008 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कोहलीने 12 जून 2010 रोजी पहिला टी20 आणि 20 जून 2011 रोजी पहिला कसोटी सामना खेळला. कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतकांसह 12344 धावा आहेत. त्याच वेळी, त्याने टी-20 आणि कसोटीमध्ये अनुक्रमे 3308 आणि 8074 धावा केल्या आहेत. कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 27 शतके झळकावली आहेत.
View this post on Instagram
कोहलीने श्रीलंकेविरुद्ध सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत किंग कोहली, रन मशीन, चेस मास्टर अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा कोहली आपल्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. त्यादरम्यान त्याला 22 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या.
या 5 सामन्यांच्या मालिकेतील पुढील चार सामन्यांमध्ये कोहलीला सलामीची संधी मिळाली आणि त्याने अनुक्रमे 37, 25, 54 आणि 31 धावा केल्या. कोहलीने प्रत्येक वेळी चांगली सुरुवात केली पण तो एकदाच 50 धावांचा टप्पा पार करू शकला. या मालिकेतून कोहलीला खूप काही शिकायला मिळाले आणि इथूनच त्याचा किंग कोहली होण्याचा प्रवास सुरू झाला.