क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ( Master blaster Sachin Tendulkar ) दहा वर्षापूर्वी म्हणजे 2012 साली आजच्या दिवशी सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. सचिनने या दिवशी बांग्लादेश विरुद्ध खेळताना आपल्या कारकीर्दीतील 100 वे शतक झळकावले होते.
भारतीय क्रिकेट आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master Blaster Sachin Tendulkar ) याच्यासाठी आजचा दिवस हा खुप खास आहे. कारण आजच्या दिवशी दहा वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये असामान्य विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
सचिन तेंडुलकरने 16 मार्च 2012 रोजी आपल्या शतकांचे महाशतक ( Sachin Tendulkar’s 100th century ) लगावत क्रिकेटमध्ये भला मोठा इतिहास निर्माण केला. हा विक्रम सचिनने आशियाई स्पर्धेमध्ये बांग्लादेश विरुद्ध खेळताना केला आहे. सचिनने 147 चेंडूचा सामना करत 114 धावांची दमदार खेळी या सामन्यात साकारली होती. हा कारनामा त्याने शेर-ए-बांग्ला स्टेडियम, मीरपुरमध्ये केला होता.
सचिन तेंडूलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यातील हा एक सर्वात मोठा विक्रम आहे. कारण जगातील कोणत्याच क्रिकेटपटूने ही कामगिरी आजपर्यंत केली नाहीय. तसेच पुढेही कोणी करु शकेल, याची शक्यताही खुपच कमी आहे. कारण वास्तविक, सचिनचं हे शतक त्याच्या बॅटमधून आलेले 100 व आंतरराष्ट्रीय शतक ( 100th International Century ) होतं. सचिनचा हा विक्रम आजही कायम आहे. सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.
सचिनने जेव्हा आपले शतकांचे महाशतक पूर्ण केले, त्यावेळी तो 38 वर्षांचा होता. तसंच त्याला 99व्या शतकानंतर 100व्या शतकासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहावी लागली होती. सचिनने 2011 च्या विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 99 वे शतक ( 99th century against South Africa ) झळकावलं होतं. तसेच 2012 च्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीमधील 462 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आला होता. या सामन्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेंडुलकर आणि गौतम गंभीर क्रीझवर होते. मात्र, तेव्हा भारताची सुरुवात खराब झाली होती आणि भारताने पहिली विकेट 25 रनवर गमावलली होती.
गौतम गंभीर बाद झाल्यावर सचिन तेंडुलकरने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यासोबत भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. यासोबतच सचिन तेंडुलकरने आपलं 100 व शतकही पूर्ण केलं. या सामन्यामध्ये सचिनने 147 चेंडूत 114 धावा ( Tendulkar’s 114 off 147 balls ) केल्या. सचिनचे शानदार शतक आणि कोहली, रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघांने बांगलादेशला 290 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारताला हा सामना जिंकता आला नव्हता.
सचिन तेंडूलकरची कारकीर्द
सचिनच्या नावावर 664 आंतरराष्ट्रीय ( 664 international matach ) सामन्यांत 34 हजार 357 धावा आहेत. ज्यामध्ये सचिनने 100 शतके झळकावली आहेत. 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने 18 हजार 426 धावा केल्या आहेत. तसेच 49 शतके झळकावली आहे. त्याचबरोबर 200 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 15 हजार 921 धावा आणि 51 शतके झळकली आहेत. मात्र त्याने एकमेव टी-20 सामना खेळताना त्याने 10 धावा केल्या आहेत.