Veer Savarkar Jayanti 2022 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी माहिती!

WhatsApp Group

Veer Savarkar Jayanti 2022 : स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे वीर सावरकर ( Veer savarkar). सावरकरांना विनायक दामोदर सावरकर या नावाने देखील ओळखले जाते. यासह स्वतंत्र्यसैनिक, राष्ट्रवादी नेते, वकील, लेखक, समाज सुधारक आणि प्रखर हिदुत्ववादी नेते ( Hindutvavadi ) म्हणून ओळखले जाणारे सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भागपूर गावामध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षीच त्यांना वीर हे टोपणनाव मिळाले होते. त्यावेळी झालं असं की, सावरकर हे 12 वर्षाचे असताना त्यांनी एका समुदायाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. त्या समुदायाने गावावर हल्ला केला होता. तेव्हापासून सावरकर यांना वीर या नावाने ओळखले जाऊ लागले. सावरकरांच्या जयंतीनिमित्त( Veer Savarkar Jayanti 2022) जाणून घेऊया त्यांच्या विषयी रंजक माहिती…

  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1901 साली रामचंद्र चिपळूणकर यांची मुलगी यमुनाबाई यांच्याशी विवाह केला.
  • 1923 मध्ये सावरकर यांनी ‘हिदुत्व’ हा शब्दप्रयोग केला होता. ते म्हणाले होते की, भारत हा फक्त त्यांचाच आहे ज्यांच्याकडे ही पवित्र भूमी आणि जन्मभूमी आहे.
  • वीर सावरकर यांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात द्विराष्ट्र सिध्दांताची स्थापना केली. ज्यात हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे राष्ट्र असावे असे म्हटले होते. 1937 मध्ये हिंदु महासभेने  प्रस्तावाच्या स्वरूपात हा ठराव पारित केला होता.
  • सावरकर यांनी राष्ट्रध्वज तिरंग्यात धर्मचक्र लावण्याचा सल्ला दिला होता.
  • सावरकर हे पहिले राजकीय कैदी होते. ज्यांना फ्रन्समध्ये अटक केल्यानंतर हे प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले होते.

 

  • ते देशातील पहिले क्रांतिकारक होते ज्यांनी देशाच्या विकासाचे चिंतन केले. बंदी जीवन समाप्त होताच त्यांनी समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा विरुद्ध आंदोलन केले.
  • सावरकरांनी अंदमान येथील एकांत कारावासात तुरुंगाच्या भिंतीवर कोळसा आणि खिळ्याच्या मदतीने कविता लिहिल्या. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा कविता लिहिण्यास सुरुवात केली.
  • सावरकर यांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस-1857 ‘ या पुस्तकाने खळबळ उडवली होती.
  • ते जगातील पहिले असे लेखक होते ज्यांच्या पुस्तकावर दोन देशात प्रकाशनापूर्वीच बंदी घालण्यात आली होती.
  • स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली होती.