
मुंबई – तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात की, आजच्या अनेक सामाजिक समस्यांतून बाहेर यायचे असेल तर गौतम बुद्धांची विचारसरणी मार्गदर्शक आहे . मनुष्यजातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेली नीतिसूत्रे संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील.
तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल. गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वांना मार्ग दाखविणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी #बुद्धपौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 16, 2022
आपल्यातील भेदाभेद, विषमता नष्ट करणारा समतेचा त्यांचा उपदेश आपण स्वीकारून वाटचाल केली तर तीच खरी मानवता असेल. आज समाजात हिंसाचार, विकृती, युद्धजन्य स्थिती वाढली आहे. या विकारांवर गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वांना मार्ग दाखवणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.