74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशाला दिल्या शुभेच्छा

WhatsApp Group

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड यांनी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्‍छा दिल्या आहेत. उपराष्‍ट्रपतींनी दिलेल्‍या एका संदेशात म्हटले आहे, “74 व्‍या प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी मी सर्व देशवासियांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

प्रजासत्ताक दिवस आपल्या घटनेमध्‍ये समाविष्‍ट असलेल्या अनेक युगांपासूनच्‍या सभ्‍यता, मूल्‍ये यांच्यावर असलेला आपला विश्‍वास अधिक दृढ करण्‍याची संधी प्रदान करतो. ज्‍याप्रमाणे आपण सर्वजण जाणतो की, या  काळामध्‍ये  सर्व प्रतिष्ठित स्‍वातंत्र्य सेनानी, महान विचारवंत आणि अनाम वीरांच्या योगदानाचे स्मरण करण्‍याची पवित्र संधीही मिळते. या सर्व महान नायकांच्या बलिदानाने आपल्‍या प्रजासत्ताकाची पायाभरणी झाली आहे.

याप्रसंगी, आपण राष्‍ट्रासाठी केलेल्‍या महान कार्याचे, देशाने विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे स्मरण करून नवीन उत्साहाने राष्‍ट्र निर्माणाच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये स्‍वत:ला पुन्हा एकदा समर्पित करुया.’’