2012 साली प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर ओह माय गॉड हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. आता ‘ओह माय गॉड’च्या यशानंतर 11 वर्षांनी अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत होता, आता तो ‘ओह माय गॉड 2’ मध्ये भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर पाहून चाहते खूप खूश दिसत आहेत, त्यासोबतच ‘ओह माय गॉड 2’ची रिलीज डेटही आली आहे. ‘ओह माय गॉड 2’मध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.
शुक्रवारी सकाळी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खुलासा केला की ‘ओ माय गॉड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याने ओ माय गॉड 2 चे नवीन पोस्टर देखील रिलीज केले. ज्यामध्ये तो भगवान शिवाच्या रूपात दाखवला आहे. रिलीजची तारीख लिहिली आहे ज्याच्या खाली OMG 2 लिहिले आहे. दरम्यान, यामी गौतमनेही हेच पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
View this post on Instagram