Asia Cup India Squad: भारतीय संघाची अधिकृत घोषणा, राहुल-विराटचे पुनरागमन; पहा संपूर्ण खेळाडूंची यादी

WhatsApp Group

Asia Cup India Squad: आशिया कप 2022 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.  विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल संघात परतले आहेत. राहुल बंगळुरूमध्ये बराच काळ फिटनेस मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे, चांगली गोष्ट म्हणजे राहुल आता फिट आहे. युवा गोलंदाज रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे बाहेर आहेत.

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांना दुखापतींमुळे संघात स्थान मिळालेले नाही. जसप्रीत बुमराह आता बंगळुरू येथील एनसीएमध्ये आपला फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेल. त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.  हर्षल पटेल टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजमध्ये होता पण दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही.

विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग या तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर बिश्नोई, चहल, जडेजा आणि अश्विन या चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. कदाचित यूएईची फिरकीची परिस्थिती पाहता भारतीय निवड समितीने हा निर्णय घेतला असेल.

दुसऱ्या ट्विटमध्ये बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये पुनर्वसनात आहेत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना बॅकअप खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

Asia Cup India Squad: भारतीय संघात या खेळाडूंचा समावेश

  • रोहित शर्मा
  • लोकेश राहुल
  • विराट कोहली
  • सूर्यकुमार यादव
  • ऋषभ पंत
  • दीपक हुडा
  • दिनेश कार्तिक
  • हार्दिक पांड्या
  • रवींद्र जडेजा
  • रविचंद्रन अश्विन
  • युझवेंद्र चहल
  • रवी बिश्नोई
  • भुवनेश्वर कुमार
  • अर्शदीप सिंग
  • आवेश खान
    बॅकअप खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल