National Herald Case: नॅशनल हेराल्डचे कार्यालय ईडीने केले सील, लिहिले- परवानगीशिवाय कार्यालय उघडू नका

WhatsApp Group

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की एजन्सीच्या परवानगीशिवाय कार्यालय उघडले जाणार नाही. यासोबतच काँग्रेस मुख्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली होती.

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून कारवाई सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाच्या 14 ठिकाणी छापे टाकले. बुधवारी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केले. परवानगीशिवाय कार्यालय सुरू केले जाणार नाही, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या नॅशनल हेराल्ड कार्यालयाला सील ठोकण्याच्या कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेस कार्यालयाबाहेरील रस्ता सील करण्यात आला आहे. कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, अशी भीती पोलिसांना आहे.