राज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर; आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक

WhatsApp Group

Mumbai Crime Branch : राज्यात नवे सरकार (Maharashtra Politics) स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यमंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहे. पण मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला, अशीही माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांनी हे चार भामट्यांनी आमदारांना गाठून मंत्रिमंडळात स्थान मिळवून देतो असे आमिष दाखवून 3 आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या भामट्यांनी आपण दिल्लीमधून आल्याचे सांगितलं आणि वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे, अशी थापही त्यांनी मारली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही, या आमदारांना फोन करून मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल र 100 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीच केली. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.