
गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे. किसान योजना असो की इतर कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटेल परंतू, म्हशीचेही आधार कार्ड काढण्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे याची तयारीही सुरु झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारत, डेयरी पशुओं का सबसे बड़ा डेटाबेस तैयार कर रहा है। डेयरी सेक्टर से जुड़े हर पशु की टैगिंग हो रही है।
आधुनिक टेक्नोल़ॉजी की मदद से हम पशुओं की बायोमीट्रिक पहचान कर रहे हैं। हमने इसे नाम दिया है- पशु आधार: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 12, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनवण्यात येणार आहे असं ते म्हणाले. भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे, असं ते यावेळी म्हणाले.