राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई : देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने बांद्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरूणांसाठी रोजगार निर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोविड काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहिले, याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक या मुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. प्रधानमंत्री यांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे