
मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) आता नवीन अंक सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकारले आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, अशी विचारणा केली आहे. तसेच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही कोर्टाकडून करण्यात आला.
सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्ष यांना नोटीस बजावली असून यामध्ये सहाही पक्षांना नोटीस दिली आहे. केंद्र सरकारला सुद्धा नोटीस दिली आहे. बंडखोर 16 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाकडून देण्यात आली. पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये बंडखोर आमदारांना आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.