मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाने मोठा घाव घातला असून रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 2 हजार 296 एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस धाडली आहे. नोटीस गेलेल्या कर्मचाऱ्यांनी 24 तासांमध्ये कामावर यावे नाहीतर कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात येईल असं या नोटीसमध्ये लिंहीलं आहे.
कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून याबाबतचा इशारा आधीपासूनच दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाकडून 2,296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
24 तासांत कामावर न आल्यास कारवाई केली जाईल, असा अल्टिमेटम कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे. यात चालक, वाहक, लिपिक, आणि टंकलेखक यांचा समावेश आहे. प्रशासनाने दिलेल्या या नोटीशीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.