पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नोटीस बजावण्यात आला आहे. ही नोटीस कोरेगाव भीमा आयोगाकडून बजावण्यात आली असून शरद पवार यांना ४ एप्रिलला आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहे.
पुण्यातील भीमा कोरेगाव येथे २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराची कारणे आयोगाकडून तपासली जात जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर शरद पवार यांची साक्ष यावेळी नोंदवली जाणार आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणारे आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी शरद पवार यांची साक्ष यावेळी नोंदवली जाणार असे सांगितले होते. त्यावेळी शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी त्यात कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यामुळे शरद पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
Maharashtra govt-appointed Inquiry commission will record statement of NCP's Sharad Pawar in the Bhima Koregaon violence case. Witnesses' statements to be recorded from August 2 & Pawar will be summoned as well: Ashish Satpute, Inquiry Commission Lawyer
— ANI (@ANI) July 9, 2021
कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी चौकशी आयोगाकडे अर्ज देखील केला होता. दरम्यान आता आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.