आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक 15921 धावा आणि एकदिवसीय प्रकारात 18426 धावा केल्या आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी इतक्या धावा करणे सोपे नसते. त्याच वेळी, त्याची कसोटीत सरासरी 53.78 आणि वनडेत 44.83 आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके (कसोटीमध्ये 51 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 49) झळकावली आहेत. त्याच्यानंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 74 शतके झळकावली आहेत.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 62 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने कसोटीत 14 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला आहे. अशाप्रकारे, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 76 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आहे.
सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. जे एका विश्वचषकात कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. हा विक्रम गाठणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे असणार नाही.
सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके (सर्व तीन फॉरमॅट) केली आहेत. जे कोणत्याही संघाविरुद्ध फलंदाजाने झळकावलेले सर्वाधिक शतक आहे. त्याच्या खालोखाल डॉन ब्रॅडमन यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके झळकावली आहेत.