Virat Kohli: विराटला टीम इंडियातून कोणीही बाहेर काढू शकत नाही; या दिग्गज खेळाडूने दिली प्रतिक्रिया

WhatsApp Group

Virat Kohli: टी-20 क्रिकेटमध्ये चांगला स्ट्राइक रेट आणि सरासरी असलेला स्टार फलंदाज विराट कोहलीसारख्या खेळाडूला संघातून कोणीही बाहेर काढू शकत नाही, असं भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर म्हणाला आहे. विराट कोहली जेव्हा फॉर्ममध्ये परतेल तेव्हा तो आणखी चांगला खेळ करेल, असा विश्वासही वसीम जाफरने व्यक्त केला आहे.

विराट कोहली बर्‍याच काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे आणि नोव्हेंबर 2019 पासून त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यावर अर्धशतकही झळकावता आले नाही आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो या मालिकेचा भाग नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही.

वसीम जाफर म्हणाला, ‘विराट तिसऱ्या क्रमांकावरच खेळायला हवा. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सलामी दिली पाहिजे, मला वाटते की ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन सारखे इतर खेळाडू संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करणे कठीण असते. चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे कोणताही खेळाडू त्याच्यासारखा खेळू शकत नाही.