Pakistan vs Prime Minister’s XI: हे कसं शक्य आहे? नो बॉल नाही, तरीही 1 चेंडूत केल्या 7 धावा, पाहा VIDEO
अनेकवेळा तुम्ही एखादा फलंदाज चौकार किंवा षटकार मारून अर्धशतक किंवा शतक झळकावताना पाहिले असेल, पण एक खेळाडू असाही आहे ज्याने सात धावा करून अर्धशतक पूर्ण केले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका चेंडूवर सात धावा काढण्याची ही खास कामगिरी करणारा खेळाडू कोण आहे, तर तो दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मॅट रेनशॉ आहे.
सध्या पाकिस्तान आणि पंतप्रधान इलेव्हनचा संघ चार दिवसीय सराव सामन्यात व्यस्त आहेत. सामन्यादरम्यान मॅट रेनशॉने सात धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. अबरार अहमदने पाकिस्तानसाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे 78 वे षटक आणले. रेनशॉने या षटकातील पाचवा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला. येथे मीर हमजाने चेंडू पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याने चेंडू पकडला तोपर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडू पळत सुटले आणि तीन धावा सहज पूर्ण केल्या.
नॉन-स्ट्राइक एंडला उभ्या असलेल्या बाबर आझमकडे हमजाने चेंडू फेकला त्याने मागे वळून लगेच चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. येथे तो चेंडू पकडण्यात अपयशी ठरला. परिणामी चेंडू सीमारेषेबाहेर गेला. अशाप्रकारे रेनशॉने या चेंडूवर एकूण सात धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.
You don’t see this every day! Matthew Renshaw brings up his half-century … with a seven! #PMXIvPAK pic.twitter.com/0Fx1Va00ZE
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2023
या सामन्यातील रेनशॉच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 113 धावा केल्यानंतर मैदानात उतरला आहे. वृत्त लिहिपर्यंत त्याने आपल्या संघासाठी एकूण 274 चेंडूंचा सामना केला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि एक षटकार आला.