Rajya Sabha Election: भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला, तरी विजय हा आमचाचं – संजय राऊत

WhatsApp Group

राज्यसभा निवडणुकांच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची भाजपसोबतची (BJP) बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहाव्या जागेसाठी आपली ताकद लावून दिली आहे. अशातच राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जात आहे, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

एवढेक नव्हे तर, भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला, तरीही सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत माध्यमांसोबत चर्चा करताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत.

“कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल, बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला समजेल”, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.