Lpg Subsidy: केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयाने सामान्यांना झटका, गॅस अनुदान नाहीच

WhatsApp Group

Lpg Subsidy: इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आधीच महागाईचे चटके सोसत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) प्रतिसिलिंडर मिळणारे अनुदान (सबसिडी) सरकारने इतिहासजमा केले आहे. गेले काही महिने हे अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा होत नसल्याची ओरड होत आहे.

मात्र, आता हे अनुदान भावी काळात सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. यापुढे स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरवर दिले जाणारे हे अनुदान केवळ उज्ज्वला योजने अंर्गत येणाऱ्या नऊ कोटी गरीब महिला लाभार्थ्यांनाच देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे देशातील लाखो ग्राहकांना यापुढे बाजारभावाने स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.