आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण, एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

WhatsApp Group

मुंबई – काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती Aryan Khan drug case. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आर्यन खान याच्याकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला आहे. एनसीबीतील सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर आता नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासले. असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली होती तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले नाही, असंही एसआयटीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असंही एसआयटीने म्हटलं आहे.