
एखाद्या व्यक्तीच्या अवयवांचे प्रमाण जास्त वाढणे देखील अनेकदा त्रासाचे कारण बनते. असाच एक प्रकार कॅनडा विमानतळावर (Canada Airport) घडला आहे. येथे एका मॉडेलला स्तनाच्या आकारामुळे (Breast Size) अडचणींचा सामना करावा लागला आहे. या कारणामुळे तिला विमानातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय मॉडेलच्या कपड्यांवरही अश्लील कमेंट करण्यात आल्या.
31 मे रोजी, 25 वर्षीय मेरी मॅग्डालीन कॅनडातील (Marie Magdalene) टोरंटो विमानतळावर अमेरिकेतील डॅलसला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली. त्यानंतर सुरक्षा संदर्भातील सर्व चौकशी झाल्यानंतर तिला अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमधून उतरण्यास सांगण्यात आले.
मेरीच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले की, हेडफोन न लावल्यामुळे आणि फ्लाइट अटेंडंटच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात ही कारवाई तिच्या स्तनाच्या आकारामुळे करण्यात आल्याचे मेरीचे मत आहे. तेव्हा मेरीने लेगिंग्ज आणि स्पोर्ट्स ब्रा घातली होती.
मेरीने इंस्टाग्रामवर यासंदर्भात सांगितले आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या लुकमुळे मला विमानातून बाहेर काढण्यात आले. कृपया भेदभाव करणे थांबवा. तुम्हा लोकांना माहित नाही की, मला यावेळी किती लाजिरवाणे आणि अमानुष वाटत आहे. दरम्यान, फ्लाइटमधून बाहेर काढल्यानंतर मेरीने एअरलाइनवर खटला दाखल करण्याबाबत बोलले आहे. मात्र, आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीय.