
मुंबई : हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात आहे, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.
यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे आज सभागृहात बोलताना म्हणाले, “महाराष्ट्रासाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये घडलेली घटना गंभीर आहे. धर्मपरिवर्तनाच्या नावाखील एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं आणि त्यासोबतच तिच्यावर अत्याचार केला जातो. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर बराच वेळाने आरोपीला पकडून कारवाई केली जाते. त्यावेळी आजूबाजूच्या समाजाकडून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जातो. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार आहेत. आरोपीला घरचं जेवण दिलं जातं. आरोपीला मदत केली जाते, अशी चर्चा आसपासच्या परिसरात आहे.
हा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप गंभीर विषय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवण्याच काम सुरू आहे आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते,” असा आरोप नितेश राणेंनी केला.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप, पाहा कुठला बंगला कुणाच्या वाट्याला
हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवल्यास तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजरातील ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षयित्र तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे”. असं राणे यावेळी बोलताना म्हणाले.