
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी (8 मे) औरंगाबादमध्ये महाविराट सभा पार पडली. या सभेला लाखोंची गर्दी उसळलीहोती. सभेला जेवढी गर्दी जमली होती, तेवढी त्यापेक्षाही मोठी गर्दी जमविण्याची ताकद शिवसेनेकडे आहे, असा दावा शिवसेना नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, या सभेसाठी आलेली लोकं ही पैसे देऊन आणले असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
विराट सभेची चा formula ? ???????? pic.twitter.com/vlNBzuuU0y
— nitesh rane (@NiteshNRane) June 9, 2022
नितेश राणे यांनी ‘विराट सभेचा फॉर्म्युला’ या असे लिहत एक ट्विट केले आहे. या ट्विट सोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हातात नोट असलेला फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे लोकांना पैसे देत असताना दिसत आहेत. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी हे ट्विट केलं आहे.