Nitesh rane car accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नितेश राणेंच्या गाडीला अपघात, ट्रकने दिली धडक!

WhatsApp Group

पुणे : मुंबई पुणे महामार्गावर सध्या गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav 2022) वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक सुद्धा अधिक आहे. काल नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला, त्यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. हा अपघात उर्से टोल नाका येथे झाला आहे. ट्रकने (Truck) धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

नितेश राणे मुंबईला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडी टोल भरण्यासाठी उभी होती. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने नितेश राणेंच्या गाडीला जोराची धडक दिली. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी संबंधित कर्नाटकमधील ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रकने धडक दिल्याचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकले नाही. ब्रेक फेलमुळे असे झाले की, दुसरे कारण होते याचा शोध पोलिस घेत आहेत. ट्रकचा ब्रेक दाबताना गाडी मागून जोरात धडकली असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.