
मुंबई – एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं.
यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील, वारीस पठाण हे देखील उपस्थित होते. यावरुन टीकेची झोड उठलेली असतानाच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
नितेश राणे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.